Your Prime Minister Is Dead – Eka Pantpradhanacha Mrutyu (युवर प्राइम मिनिस्टर इज डेड – एका पंतप्रधानाचा मृत्यू)Author/s: Anuj Dhar
In stock
ललिता शास्त्रींनी जेव्हा त्यांच्या पतीचे पार्थिव पाहिले तेव्हा त्यांच्या मृत्यूला केवळ काही तासच झाले आहेत, हे खरेच वाटत नव्हते. त्यांचा चेहरा निळाशार पडला होता आणि सुजला होता. शरीर फुगले होते आणि त्यावर विचित्र छेद घेतलेले होते. पलंगपोस, उशा आणि कपडे सगळेच रक्तात भिजले होते. कुटुंबीयांनी शंका व्यक्त केल्यावर लालबहादूर शास्त्रींच्या चेहऱ्यावर लगेचच चंदनाचा लेप लावण्यात आला आणि तरीही भारताच्या दुसऱ्या पंतप्रधानांचा मृत्यू खरोखरच हृदयविकाराच्या झटक्याने झाला का? हा वाद शमला नाहीच. लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूत केजीबी, सीआयए किंवा देशातल्या आतल्या गोटातल्या कुणाचा तरी हात असल्याचे आरोप वेळोवेळी होत राहिले.
श्स्त्रींच्या मृत्युच्या राह्स्याबद्दलचे हे पहिले मोठे संशोधन. यात अनुज धर यांनी अधिकृत निवेदनाला छेद देणारी दुसरी आणि अस्वस्थ करणारी बाजू मांडली आहे. धर यांच्या लोकप्रिय ‘इंडिया’ज बिगेस्ट कव्हर अप’ या पुस्तकामुळे सुभाषचंद्र बोस यांच्यावरील फायली खुल्या होण्यास मदत झाली. प्रसिद्ध वेब सिरीज ‘बोस:डेड अलाइव्ह-लाही या पुस्तकाने प्रेरणा मिळाली.
Reviews
There are no reviews yet.