- You cannot add "Garbhasanskar (गर्भसंस्कार)" to the cart because the product is out of stock.
प्रत्येक माणूस खर्या आनंदाच्या शोधात भटकत असतो. परंतु त्याला खरा आनंद न गवसल्याने तो धन-दौलत, मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा, नाव-लौकिक, सुख-सुविधा, मनोरंजन अशा भौतिक गोष्टींमध्येच आनंद शोधत राहतो. पण या गोष्टींमुळे त्याला खरा आनंद मिळतो का? स्वीकाराच्या जादूमुळे सुखाचा खजिना प्राप्त करायचा की अस्वीकाराच्या शापाने जीवनभर तक्रारीच करत बसायचे हा निर्णय घेण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला निश्चितच मदत करेल. माणसाच्या दुःखाचे मूळ कारण त्याचे अज्ञान, मान्यता आणि वाईट वृत्ती आहे. यावरच या पुस्तकात प्रकाश टाकला असून संकुचित वृत्तीतून मुक्त होऊन खुल्या मनाने कसे जगावे व त्वरित आनंद कसा प्राप्त करावा, हा सरश्रींद्वारा दिला गेलेला संदेश म्हणजे आजच्या या तणावपूर्ण धकाधकीच्या जीवनात प्रकाशाचा एक छोटासा किरण आहे. या छोट्याशा किरणाद्वारे आपण ज्ञानाच्या तेजसूर्यापर्यंत सहजतेने पोहोचू शकाल.
Reviews
There are no reviews yet.