- You cannot add that amount to the cart — we have 1 in stock and you already have 1 in your cart. View cart
Snehgatha (स्नेहगाथा)Author/s: Mangesh Padgaonkar
In stock
मंगेश पाडगांवकर यांनी रेखाटलेली अनेक व्यक्तिचित्रे, आवडलेल्या पुस्तकांचे त्यांनी केलेले रसग्रहण, आणि त्यांनी घेतलेल्या मुलाखतींचा संग्रह.
माणूस समजून घ्यायचा प्रयत्न करणे, त्याच्या सुखदुःखामागची कारणमीमांसा जाणून घ्यायचा प्रयत्न करणे हाच आपल्या लेखनामागचा उद्देश आहे, असे मंगेश पाडगांवकर यांनी अनेकदा म्हटले आहे. आपल्या कवितेमधून हा शोध ते घेतच आले; पण गद्य लेखनातूनही त्यांनी हा शोध सातत्याने घेतला असे दिसेल. कधी व्यक्तिचित्रणात्मक लेखनाच्या रूपाने, कधी मुलाखतींच्या रूपाने. ‘स्नेह्गाथा’ वाचताना याचे वारंवार प्रत्यंतर येईल.
‘स्नेहागाथा’मधले लेखन तीन विभागांत सामावले आहे. अनेक वर्षांपासून ज्यांच्याशी जवळची मैत्री जुळली त्या साहित्यिकांविषयीचे लेख, पूर्वसूरी तसेच समकालीन साहित्यिकांबद्दल त्यांनी केलेले लेखन आणि त्यांनी वेळोवेळी केलेले समीक्षात्मक लेखन व घेतलेल्या मुलाखती. जितकी मोहक कविता पाडगांवकर लिहितात तितकेच आकर्षक आणि अर्थघन गद्यही ते सहज लिहितात.
Reviews
There are no reviews yet.