- You cannot add that amount to the cart — we have 1 in stock and you already have 1 in your cart. View cart
वरवर पाहता ज्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही असे नेते निनावी मारेकऱ्यांकडून किडामुंग्यांसारखे मारले जात आहेत. ते मारेकरी अगदी एखाद्या कसायासारखे आपले काम करतात. फरक इतकाच की तेकेलेल्या कामाचा किंचितसा मागमूसही ठेवत नाहीत. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं, अश्विन सांघीच्या या गूढ आणि खिळवून ठेवणाऱ्या विश्वात. रोझाबल लाइन, चाणक्याज चान्ट, द कृष्णा की आणि सियालकोट सागा नंतर अखेरीस अश्विन सांघी परत आलेत, आणखी एका चित्तथरारक कथा घेऊन – ही कथा आहे अशा माणसांची, जी ‘कालचक्राचे’म्हणजे काळाच्या चक्राचे रक्षण करतात. सांघीनी या कथेमध्ये धर्मांच्या स्वतःवरच उलटणाऱ्या संघर्षात परस्परांशी लढायला उभ्या ठाकलेल्या लोकांचं वर्णन केलं आहे. त्या संघर्षाचीपरिणती मंदगतीने आणि नियोजनबद्ध मानवी क्रौर्यामध्ये होते, जे मानवाच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचं असतं. त्यातच एक भोळसट शास्त्रज्ञ विजय सुंदरम या अंदाधुंदीमध्ये घेरला जातो. त्याला पुसटशी कल्पनाही नाही की त्याच्याशी ज्या शक्तींचा का शक्तीं ही संबंध नाही असं त्याला वाटतंय त्यांच्यामुळेच त्याच्या प्रयोगशाळेबाहेरच्या जगावर एवढा ताण आलाय आणि लवकरच त्या जगाच्या चिंधड्या उडणार आहेत.
Reviews
There are no reviews yet.