Himalay Ni Ek Tapasvi (हिमालय नि एक तपस्वी)Author/s:

In stock

Description

आत्मिक सौंदर्याचे अलौकिक दर्शन… आध्यात्मिक नीरक्षीर विवेक ठेवून भारत आणि तिबेट या देशांचा चोखंदळपणे प्रवास करणार्‍या अत्यल्प अभ्यासकांमध्ये पॉल ब्रन्टन यांचे स्थान अग्रक्रमाचे आहे. मूळातच पत्रकाराचा पिंड असल्याने त्यांच्या लेखनातून हिमालयाच्या उत्तुंग हिमशिखरांचे आणि पर्वतरांगांचे वर्णन विलोभनीयरीत्या प्रकटते. या प्रवासात त्यांच्या अनेक योगी आणि सिद्ध व्यक्तींबरोबर झालेल्या भेटी फारच अद्भूत आहेत. या भेटींनीच त्यांना पौर्वात्य तत्त्वज्ञानाचा महत्त्वाचा विश्लेषक बनविले. हे नितांतसुंदर पुस्तक आपल्याला अनेक साक्षात्कार घडवते. जसे की… आपल्याजवळ या वादळी जगात शांततेचे मरूद्यान असायलाच हवे, मग आपण कोणत्या काळात जगत आहोत हा मुद्दा गौण ठरतो. रोजच्या जीवनातून काही काळासाठी असे निवृत्त होणे आपला दौर्बळपणा नसून सामर्थ्य आहे.आपल्यातील अलौकिक आणि गहन शांततेचा आपल्याला शोध लागला की त्या अपरिचित शक्तीशी, अमर्याद ज्ञानाशी आणि सुशीलतेशी जोडले जाण्याचे फायदे आपल्या लक्षात येतील. ‘हिमालय आणि एक तपस्वी’ हे पुस्तक प्रवासवर्णन आणि गहन अध्यात्मिक अनुभव यांचा सहजसुंदर मिलाफ आहे. या प्रवासात जसजसे आपण लेखकाबरोबर हिमालयाच्या पर्वतरांगांमधून तिबेटमधल्या कैलास पर्वताकडे जाऊ लागतो, तसतसा लेखक आपल्याला आणखी एक विलक्षण आणि कालातीत आंतरिक प्रवासाचा मार्ग दाखवतो. हा मार्गच भौतिक आयुष्यातील चढउतार पार करण्याचे सामर्थ्य आपल्याला देतो.

Shipping & Delivery
For library customers in Pune, order deliveries may take 0-3 days.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Himalay Ni Ek Tapasvi (हिमालय नि एक तपस्वी)”

Your email address will not be published. Required fields are marked *