माणसाला गुढ आणि रहस्यमय गोष्टींविषयी जाणून घेण्याची ओढ कायम असते. जगात अनेक गुढे आहेत. त्यांपैकी एक म्हणजे ‘बर्मुडा ट्रँगल’. फ्लोरिडा. सारगास्सो समुद्र आणि बर्मुडा या तीन बिंदूंच्या कक्षेत येणाऱ्या सागरी प्रदेशात गेल्या शतकात अनेक नौका, विमाने, माणसे कोणताही मागमूस न ठेवता रहस्यमय रित्या गायब झाली आहेत.
या ट्रँगलमध्ये घडलेल्या व ज्यांची नोंद केलेली नव्हती, अशा घटनांचा वेध घेणे, त्या तपासून त्याचे विवेचन करणे, नव्याने घडलेल्या घटनांचा आढावा, बर्मुडा ट्रँगल मध्ये नेमके काय घडते, या विषयी चार्लस बर्लीझ यांनी ‘विदाऊट ए ट्रेस’मधून लिहिले आहे.
त्याचा मराठी अनुवाद विजय देवधर यांनी केला आहे. सागरी रहस्ये, विस्मृतीतील सफरी, गायब झालेल्यांचे संदेश, वैश्विक दडपादडपी, हरवलेल्या अँटलांटिसची कहाणी, काळाची दुसरी बाजू, उडत्या तबकड्या, अज्ञाताकडे जाणाऱ्या गुढ वाटा आदी चित्तथरारक विषय यात आले आहेत.
Reviews
There are no reviews yet.