Vilasmandir (विलासमंदिर)Author/s: G. N. Datar
इतिहास -काळातील राजे व सरदार यांची विश्रांती घेण्याची व विलास करण्याचे खास वाडे बांधलेले असत. त्या वाड्यांनाच विलासमंदिर असे म्हणत. या विलासमंदिरात जी कारस्थाने होत, बेत रचले जात त्याचेच वर्णन या कादंबरीत आहे. म्हणून विलासमंदिर हे सार्थ नाव ठेवले आहे. सध्याच्या राज्यकर्त्याचीही अशी विलासमंदिरे असतात. त्यांना आधुनिक भाषेत 'फार्महाऊस' असे म्हणतात इतकेच. अशा विलासमंदिराभोवती बहुतेक वेळा उपवन किंवा उद्यान केलेले असते. या कादंबरीत राजा नसून इरावती या राणीचेराज्य आहे. कादंबरीची सुरूवातच विलासमंदिर येथून झालेली आहे. कादंबरीतील नावे व वर्णन यावरुन या कादंबरीतील घटना हजार वर्षापूवीच्या आहेत असे वाटते. गो. ना. दातार हे स्वतः वैद्य होते. ते आयुर्वेदिक औषधे देत असत. म्हणूनच त्यांच्या कादंबरीत एका वैद्याचे पात्र असतेच. गो. ना. दातारांच्या सर्वच कादंबऱ्याप्रमाणे या कांदबरीतही रहस्यमय घटना आहेत आणिकांदबरीचा शेवट विवाह समारंभाने होतो. डी गो. ना. दातार हे कुमार वयात माझ्या मनावर जबरदस्त ठसा उमटवून गेलेले कादंबरीकार. त्याच्या कांदबऱ्या म्हणजे कमालीची रंजकता आणि कल्पकता. वाचकाला खेचून नेणारी रहस्यमयता, अद्भुत घटनांचा अखंड प्रवाह, ठसठशीत व्यक्तीचित्रणे, चित्रात्मक शैलीतील वर्णने आणि प्रौढ पण रसाळ भाषा यांचा एक मनोहर मिलाफ दातारांच्या कादंबऱ्यात झालेला आहे. घरात जवळपास वा वाचनालयात उपलब्ध होणाऱ्या त्यांच्या सर्व कादंबऱ्या मी शोध घेऊन वाचल्या; पण कालीकामूर्ती व बंधुद्वेष अधिक. आपल्या पायदळ जीवनातून एका रंगीबेरंगी विश्वात आपल्याला नेण्याचे या कादंबऱ्यांचे सामर्थ्य असाधारणच आहे. रेनॉल्ड्स वरुन या कादंबऱ्या रुपांतरीत केलेल्या आहेत हे पुढे केव्हा तरी मला कळले. काहीच बिघडले नाही.Total Pages: 189
In stock
इतिहास -काळातील राजे व सरदार यांची विश्रांती घेण्याची व विलास करण्याचे खास वाडे बांधलेले असत. त्या वाड्यांनाच विलासमंदिर असे म्हणत. या विलासमंदिरात जी कारस्थाने होत, बेत रचले जात त्याचेच वर्णन या कादंबरीत आहे. म्हणून विलासमंदिर हे सार्थ नाव ठेवले आहे. सध्याच्या राज्यकर्त्याचीही अशी विलासमंदिरे असतात. त्यांना आधुनिक भाषेत ‘फार्महाऊस’ असे म्हणतात इतकेच. अशा विलासमंदिराभोवती बहुतेक वेळा उपवन किंवा उद्यान केलेले असते. या कादंबरीत राजा नसून इरावती या राणीचेराज्य आहे. कादंबरीची सुरूवातच विलासमंदिर येथून झालेली आहे. कादंबरीतील नावे व वर्णन यावरुन या कादंबरीतील घटना हजार वर्षापूवीच्या आहेत असे वाटते. गो. ना. दातार हे स्वतः वैद्य होते. ते आयुर्वेदिक औषधे देत असत. म्हणूनच त्यांच्या कादंबरीत एका वैद्याचे पात्र असतेच. गो. ना. दातारांच्या सर्वच कादंबऱ्याप्रमाणे या कांदबरीतही रहस्यमय घटना आहेत आणिकांदबरीचा शेवट विवाह समारंभाने होतो. डी गो. ना. दातार हे कुमार वयात माझ्या मनावर जबरदस्त ठसा उमटवून गेलेले कादंबरीकार. त्याच्या कांदबऱ्या म्हणजे कमालीची रंजकता आणि कल्पकता. वाचकाला खेचून नेणारी रहस्यमयता, अद्भुत घटनांचा अखंड प्रवाह, ठसठशीत व्यक्तीचित्रणे, चित्रात्मक शैलीतील वर्णने आणि प्रौढ पण रसाळ भाषा यांचा एक मनोहर मिलाफ दातारांच्या कादंबऱ्यात झालेला आहे. घरात जवळपास वा वाचनालयात उपलब्ध होणाऱ्या त्यांच्या सर्व कादंबऱ्या मी शोध घेऊन वाचल्या; पण कालीकामूर्ती व बंधुद्वेष अधिक. आपल्या पायदळ जीवनातून एका रंगीबेरंगी विश्वात आपल्याला नेण्याचे या कादंबऱ्यांचे सामर्थ्य असाधारणच आहे. रेनॉल्ड्स वरुन या कादंबऱ्या रुपांतरीत केलेल्या आहेत हे पुढे केव्हा तरी मला कळले. काहीच बिघडले नाही.
Reviews
There are no reviews yet.