The Teachings Of Ramana Maharshi (रमण महर्षी अध्यात्मिक संवाद आणि मार्गदर्शन)Author/s: Arthur Osborne
In stock
श्री रमण महर्षींना भारतातील सर्वाधिक महत्त्वाच्या सार्वकालिक ऋषींमध्ये स्थान दिलं जातं. सतराव्या वर्षी त्यांना आध्यात्मिक जागृतीचा अनुभव आला. त्यानंतर ते अरुणाचलाच्या पवित्र पर्वतरांगांमध्ये गेले. त्यांच्याभोवती शिष्यांचा समुदाय गोळा झाला आणि बघता बघता त्यांची संख्या वाढत गेली. तिथे त्यांच्या सान्निध्यात आलेल्या कार्ल युंग, हेन्री कार्टियर-ब्रेसन आणि सॉमरसेट मॉम यांच्यासारख्या प्रभावी लेखक, कलाकार आणि साधक असलेल्या व्यक्तींच्या आयुष्यांना त्यांचा परीसस्पर्श झाला. आजतागायत जगभरातील लाखो लोकांना त्यांच्या शिकवणुकीतून स्फूर्ती मिळाली आहे आणि अद्यापही लाखो जणांना ती मिळत आहे. आर्थर ऑस्बोर्न या त्यांच्या शिष्याने संपादित केलेल्या या पुस्तकातून श्री रमण महर्षींच्या विचारांचा अभिजात खजिना खुला झाला आहे. आताच्या काळात कसं जगावं, संपत्ती, स्वातंत्र्य, ज्ञान आणि आपल्या खऱ्या स्वरूपाचा, प्रकृतीचा अर्थ अशा मुद्द्यांवरच्या त्यांच्या विचारांचा हा संच आहे.
Reviews
There are no reviews yet.