Sex, Scotch and Scholarship (सेक्स,स्कॉच अँड स्कालरशिप)Author/s: Khushwant Singh
In stock
खुशवंत सिंग म्हणजे एक बहुरंगी आणि बहुढंगी असे व्यक्तिमत्त्व, साहित्य, इतिहास, संस्कृती, तत्त्वज्ञान आणि विविध विषयांवरील स्तंभलेखन यामुळे ते भारतात व परदेशातही वाचकप्रिय लेखक आहेत.’सेक्स, स्कॉच अँड स्कॉलरशिप’ या त्यांच्या निवडक लेखसंग्रहात काही सेक्स, थोडी स्कॉच आणि बरंच काही स्कॉलरशिप, अशा विषयांवरील लेख आहेत. त्यांचे निसर्गप्रेम, पंजाब प्रश्नाबाबतची आस्था, जगातील सर्व धर्मांचा अभ्यास आणि त्याचबरोबर स्वत:च्या शीख धर्माचे संशोधन, या विषयांवरील अभ्यासपूर्ण आणि उत्कट विवेचन ही या संग्रहाची वैशिष्ट्ये आहेत. खुशवंत सिंग यांचे खास खुसखुशीत आणि परखड शैलीत केलेले स्वत:चे सविस्तर असे लिखाण हे या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. किंबहुना खुशवंत सिंग यांनी लिहिलेल्या व्यक्तिचित्रांपैकी हे परिपूर्ण असे व्यक्तिचित्र आहे. खुशवंत सिंग यांच्या ‘सेक्स, स्कॉच अँड स्कॉलरशिप’ या पुस्तकातील एकूण लेखनाचा केंद्रबिंदू हा ‘माणूस’ आहे, म्हणून हे लेख वाचताना प्रत्येकजण नकळत अंतर्मुख होतो.
Reviews
There are no reviews yet.