नर्मदा परिक्रमेचं हे कथन लेखक जगन्नाथ कुंटे यांनी पहिल्यांदा केलेल्या परीक्रमेचे अनुभव यापूर्वी त्यांच्या पुस्तकात प्रसिद्ध झाले आहेत. ‘साधनामस्त’ मध्ये त्यांच्या चौथ्या परीक्रमेचे अनुभव आले आहेत.
पहिल्या परीक्रमेपेक्षा ही वेगळी. त्यात भेटणारी माणसं वेगळी, अनुभव वेगळे. मात्र ही परिक्रमा पहिल्या परीक्रमेप्रमाणेच बाह्य प्रवासाबरोबरच केलेल्या आंतरिक प्रवासाची. हे साधनेतील अनुभव आणि जीवनचिंतन आहे.
जाता जाता वाचकाला ते तत्वज्ञानही सांगतात, ‘अध्यात्म्याच्या मार्गात शॉर्टकट नाही. कष्टाची तयारी हवी. निष्ठा हवी श्रद्धा हवी. साधनेचे कठीण पत्थर फोडायची छाती हवी, तेव्हा कुठं गुरुकृपेनं साधनेचा झरा झुळूझुळू वहायला लागतो.’ परिक्रमा ही साधनाच आहे, असं ते सांगतात.
Reviews
There are no reviews yet.