Raya (राया)Author/s: Shrinivas Reddy
In stock
कृष्णदेवराय हा बहुजन पार्श्वभूमीतून पुढे आलेला राजपुत्र सन १५०९मध्ये विजयनगरच्या सिंहासनावर विराजमान झाला. एकीकडे कमकुवत झालेलं साम्राज्य आणि दुसरीकडे चोहो बाजूंनी शत्रू अशा, प्रसंगी खचवून टाकणार्]या परिस्थितीला कृष्णदेवराय धैर्याने समोरा गेला आणि आणि आपल्या २० वर्षांच्या विलक्षण कार्यकाळात त्याने इतिहास घडवला! आपल्या कारकिर्दीतल्या सर्व लढाया तो जिंकला आणि त्याने दक्षिण भारताला एकअमली छत्राखाली आणलं. आज कृष्णदेवराय भारतीय इतिहासातल्या थोर राजांपैकी एक मानला जातो, ते केवळ रणांगणावर त्याने अतुलनीय यश मिळवलं म्हणून नाही, तर तो खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवरचा पहिला भारतीय राजा होता म्हणून. जागतिकीकरण आणि बहुसांस्कृतिकता यांसारख्या आव्हानांना त्याला तोंड द्यावं लागलं होतं. या सांस्कृतिकदृष्ट्या गतिशील कालखंडाने कृष्णदेवरायाला भारतीय इतिहास आणि परंपरा यांचा अभ्यास करण्याची प्रेरणा दिली. एक ‘तत्त्वज्ञ-राजा’ असलेला कृष्णदेवराय स्वतः एक निष्णात कवी होता. या विलक्षण आणि उत्कंठावर्धक पुस्तकात अत्यंत सूक्ष्म संशोधनाची रंजक मांडणी करण्यात आली आहे. पोर्तुगीज आणि फारसी स्रोतांबरोबर अनेक दुर्लक्षित तेलुगू स्रोतांवर हे पुस्तक आधारित आहे. थोर सम्राट कृष्णदेवराय याचं हे मनोवेधक चरित्र इतिहासप्रेमींच्या व रसिक वाचकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास वाटतो.
Reviews
There are no reviews yet.