प्रस्तुत पुस्तक हे लेखकाने याच शीर्षकाने लिहिलेल्या स्तंभातील रचना आहेत. मक्तूबचा अर्थ आहे, ‘जे लिहिलेलं आहे’. हे पुस्तक जिज्ञासूंना विश्वासाच्या, आत्ममंथनाच्या आणि परिवर्तनाच्या प्रवासावर घेऊन जाते. लेखक म्हणतात त्याप्रमाणे, हे सल्ला देणारं पुस्तक नसून, अनुभवांची देवाण-घेवाण करणारं आहे.’ या पुस्तकातील प्रत्येक कथा आयुष्याकडे आणि संपूर्ण जगातील लोकांच्या जीवनाकडे नव्याने पाहण्याचा उज्ज्वल मार्ग दाखवते. त्यातून आपल्याला आपल्या सामूहिक तसंच व्यक्तिगत मानवतेसंबंधी सार्वत्रिक सत्य जाणता येते. जसं लेखकांनी लिहिलं आहे, ‘जो मनुष्य फक्त प्रकाशाचा शोध घेतो आणि आपल्या जबाबदार्या टाळत राहतो, त्याला कधीही ज्ञान प्राप्त होणार नाही आणि ज्याची नजर सूर्यावर खिळून असते… अंतिमतः त्याला अंधत्व प्राप्त होते.’ या प्रज्ञायुक्त कथांमध्ये बोलणारे सर्प, पर्वतारोहण करणार्या वृद्ध स्त्रिया, आपल्या गुरूंसमोर जिज्ञासा व्यक्त करणारे शिष्य, संवाद साधणारे बुद्ध, रहस्यमयी संन्यासी आणि विश्वाची गूढ रहस्य सांगणारे अनेक संत यांचा समावेश आहे.
Reviews
There are no reviews yet.