एका किल्ल्याच्या कुशींत जन्मलेला एक गडवेडा माणूस जन्मभर किल्ले भटकला किल्ल्यांएवढे प्रेम त्याने कशावरही केले नाही.
दरदर झरत्या पावसांत काकडत्या थंडीत भाजणार्या उन्हांत रात्रीं, दिवसां, पाहाटेंस, सायंकाळी तो किल्ले चढला-उतरला.
पांच तपे उलटून गेलीं किल्ल्यागडांचा वेध घेत तो त्यांच्या वाटा तुडवीत राहिला, कधीं आनंदाने थिरकला, कधीं प्रमादाच्या पुराबरोबर वाहात गेला असे त्याचे किल्ल्यागडांशी मैत्र आयुष्याच्या सायंकाळीं क्षण स्वस्थ बसून तो तीं सगळीं स्मरणे जागवीत आहे.
Reviews
There are no reviews yet.