विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच मानवाचे हजारो वर्षे उराशी बाळगलेले स्वप्न साकार झाले आणि त्याने स्वच्छंदपणे आकाशात झेप घेतली. विमानोड्डाण ते अंतराळप्रवास या प्रगतीला साठ-पासष्ट वर्षेच पुरली. मधल्या काळात विनाशकारी अणूबॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्ब यांचेही शोध लागले.
आजच्या छोट्या मुलांनासुद्धा अंतराळवीरांचे चमकदार पोशाख, धूर आणि ज्वाळा सोडत उडणारे अग्निबाण आणि अंतराळयाने, प्रलयकारी अस्त्रांच्या वापराचे दुष्परिणाम या गोष्टी माहिती आहेत.
पण ही सर्व प्रगती मानवाने जर प्रथमच केली असेल, तर जगातल्या सर्व प्राचीन धर्मग्रंथांमधले देव अशाच गोष्टी करत होते, असा उल्लेख कसा आला? खडकांत कोरलेली चित्रे, कालनिश्चिती करता येऊ न शकणाNया दंतकथा, लोककथा तशीच वर्णने कशी करतात? ज्ञात असलेल्या इतिहासकाळाला विसंगत असलेले प्रगत ज्ञान कसे आढळते?
एरिक फॉन डेनिकेन यांनी जगाच्या कानाकोपNयांत प्रवास करून हे सर्व देव म्हणजेच पुन्हा-पुन्हा पृथ्वीला भेट देणारे अंतराळवीरच होते; असा क्रांतिकारक आणि वादग्रस्त
Reviews
There are no reviews yet.