Avaghe Harimay Yogbale (अवघे हरिमय योगबळे)Author/s: Sudhir Kale
In stock
मी बद्रीनाथ गावात प्रवेश केला. प्रथम बद्रीनाथचे व माझा प्रिय सखा हनुमंताचे दर्शन घ्यावे याकरीता मी मंदिराकडे वळलो. शरीराला खूपच थकवा जाणवत होता. मी थोडेसे पाणी प्यायलो. हळूहळू पायर्या चढून मंदिरात गेलो. प्रथम मागे जाऊन सख्याचे दर्शन घेतले. त्याची प्रेमळ दृष्टी माझ्यावर अतीव प्रेमाचा वर्षाव करीत होती असे मला वाटले. बराच वेळ प्रेमभराने मी दर्शनसुख अनुभवीत होतो. तेथून श्री बद्रीनाथ मंदिरात मी प्रवेश केला. श्री बद्रीनाथांपुढे नतमस्तक झालो. त्यांच्या कृपेनेच हा सुखाचा सोहळा मला भोगता आला होता. मंदिरातून बाहेर पडतांना रावळजींनी मूठभर प्रसाद दिला. आज कितीतरी दिवसांनी थोडेसे का होईना पण अन्न मिळाले होते. त्या मूठभर प्रसादाने पोट भरून गेले. याचे कारण असे की पोटात अन्न गेले नसले तरी आनंद होतो, सद्गुरुंच्या परीक्षेला उतरल्याचा. सद्गुरुंच्याच कृपेने त्यांची आज्ञा मी पुरेपूर पाळू शकलो होतो. अयाचित वृत्तीने राहूनच मी येथील वास्तव्य पार पाडले होते अन् माझ्या हातून घडलेल्या एवढ्याशा साधनेचे फळ मात्र अपरंपार होते.
Reviews
There are no reviews yet.