गुंतवणूक आणि प्राप्तीकर हे दोन्ही विषय नोकरदारांपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वांच्याच जिव्हाळ्याचे आहेत. तरीही त्याची पुरेशी माहिती. आपल्याला नसते. त्यामुळे कोणावर अवलंबून राहण्याऐवजी या पुस्तकाचा आधार घेणं आता शक्य आहे. लेखक मिलिंद संगोराम यांनी
गुंतवणूक, कर्ज, विमा आणि प्राप्तीकर या चार विभागांमध्ये गुंतवणूकदारांना मार्गदर्शन केलं आहे.
व्याजदर वाढत असताना जुनी मुदतठेव मोडावी का, या कळीच्या प्रश्नापासून दुसरे घर वाचवते प्राप्तिकर, कॅपिटल गेन्स, छोट्या व्यावसायिकांना हिशोबापासून मुक्ती देणारे कलम ४४ एडी आणि २० हजार रुपयांवर रोखीत खर्च केला तर काय होते यांसारख्या अनेक शंकाचे निरसन संगोराम यांनी केलं आहे.
Reviews
There are no reviews yet.