Asach Hota Naa Tulahi (असंच होतं ना तुलाही)Author/s:

In stock

Category: Tag:
Description

या कवितासंग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे कविता कवीच्या हस्ताक्षरामध्ये आहेत. हस्ताक्षर हे व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब असतं. इथं तुम्ही कवितेबरोबर कवीही वाचू शकता. मिलिंदनं मुखपृष्ठ आणि मांडणी स्वतः केलेली आहे. आशयाप्रमाणं हस्ताक्षरात, मांडणीत बदल दिसतात. संग्रह पाहणं हा सुखद अनुभव आहे. वाचकाला त्यातून ‘पर्सनल टच’ ची अनुभूती मिळते. हे झालं दृश्य स्वरूप. मी कवितेतला जाणकार नाही तरी मला जाणवलेली वैशिष्टयं – मिलिंदच्या कवितेतील शब्द हे कविता म्हणून अलंकारिक, दुर्बोध असे नाहीत, ते रोजच्या जगण्यातलेच. मात्र आशयातून थक्क व्हावं इतकं तो तुम्हाला फिरवून आणतो. कल्पनांची जादुई कसरत त्यामध्ये असतेच पण त्यापलीकडे बरच काही अव्यक्त ज्यांन त्यानं आपापलं शोधावं असं मोठं अवकाश तो उपलब्ध करून देतो. कविता शब्दांमध्ये नसते तर दोन ओळींच्या मधल्या अवकाशात असते. ज्यामध्ये जो तो स्वतःला जोडून घेऊ शकतो, अशी साधीशी तरीही मोठा आशय कवेत घेणारी त्याची कविता आहे. मिलिंदची कविता कुठेही देवाला, दैवाला शरण गेलेली नाही. ती नियतीवादी, गूढवादी नाही तर समकालीन मानवी व्यवहारांच्या खोलीचा शोध घेणारीआहे.

Shipping & Delivery
For library customers in Pune, order deliveries may take 0-3 days.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Asach Hota Naa Tulahi (असंच होतं ना तुलाही)”

Your email address will not be published. Required fields are marked *