अॅडॉल्फ हिटलरची प्रेमकहाणी
‘रविवार होता. हिटलरने उरली सुरली महत्त्वाची कामे उरकली… अखेरची लढाई देण्याची तयारी करावी या आदेशावर सही केली. हे होईपर्यंत पहाटेचे तीन वाजले. मग तो शयनगृहात गेला.
इव्हा व अॅडॉल्फ यांच्या विवाहानंतरची ही दुसरीच रात्र होती… अखेरची रात्र होती. उजाडताच इव्हा अगोदर खोलीबाहेर आली.
तिने फ्राऊ जुंगला बोलावून घेतले. कपाटातला आपला रुपेरी केसाळ कातड्याचा फॉक्स कोट काढला व जुंग हिच्या अंगावर घालत ती म्हणाली, “फ्राऊ, ही माझी जातानाची भेट आहे. नाही म्हणू नको… ”
इव्हाने त्या मुलीला जवळ घेतले व पाठीवर थोपटीत म्हणाली, “इथून निसटण्याचा प्रयत्न कर… सुखरूप बाहेर पडलीस तर बव्हेरीयाला माझा नमस्कार सांगायला विसरू नकोस” जुंगला रडू कोसळले.’
मरणाच्या छायेतील इव्हा – अॅडॉल्फ यांच्या मीलनाची ही कहाणी.
Reviews
There are no reviews yet.