The Lion’s Game (द लायन्स गेम)Author/s:

In stock

Category: Tag:
Description

पॅरिसहून बोर्इंग-७४७ विमान सुटले. त्या दोन मजली विमानातील तीनशे प्रवाश्यांमध्ये एक शरणार्थी कैदी व दोन गुप्तचरही होते.
निम्म्या वाटेत अचानक त्या विमानाकडून संदेश येणे बंद झाले.
खूप प्रयत्न करुनही कुठलाच प्रतिसाद येईना; आणि तरीही ते अचूक न्यूयॉर्कच्या विमानतळावर पोहोचले; पण पुढे काहीच होईना.
त्या विमानात भीतीने गोठून टाकणारी एक घटना घडली होती….
विमानातला कैदी म्हणजे मानवी शरीरात वस्ती करणारा
एक रक्तपिपासू् सिंह होता. आठजणांची शिकार करायची होती त्याला.
त्यासाठी तो पंधरा वर्षे वाट पहात होता.
आणि आता तो अमेरिकेत मोकाट सुटला होता….
आठजणांच्या शिकारीपेक्षाही एक महत्त्वाची कामगिरी त्याच्याकडे होती….
एफबीआय आणि सीआयए या दोन्ही गुप्तचर संस्थांना हुलकावत होता तो.
जॉन कोरी हा एकमेव डिटेक्टिव्ह सत्याच्या जवळ पोचत होता.
किती काळ हा सिंह मोकाट सुटेल? किती दिवस नशीब त्याला साथ देईल? जुगार आणि प्रेमप्रकरण यामधले नशीब तर कधीही हुलकावणी देईल. जॉनसारख्या अनुभवी गुप्तहेराला हे चांगलेच माहित होते.
जसजसा तो मागोवा घेत राहिला, तसतसे मन बधीर करणारे सत्य त्याला कळत गेले. पण संपूर्ण सत्य गवसण्याच्या आत ….
पुढे काय झाले ते या कादंबरीत वाचा. सबंध अमेरिकेत खळबळ उडवून देणाNया कादंबरीचा अनुवाद तुम्हाला जागीच खिळवून ठेवील.

Shipping & Delivery
For library customers in Pune, order deliveries may take 0-3 days.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “The Lion’s Game (द लायन्स गेम)”

Your email address will not be published. Required fields are marked *