मानसशास्त्र क्षेत्रात अजरामर नाव असलेले डॉ. अल्बर्ट एलिस यांचे डॉ. अंजली जोशी यांनी लिहिलेले हे चरित्र आहे. त्यांच्या जीवनप्रवासाचा वेध घेताना त्यांच्या मानसिक प्रतिक्रिया, मानसिक घडामोडींचाही मागोवा लेखिकेने घेतलं आहे. विवेकनिष्ठ मानसोपचाराचे तत्व त्यांनी रुजविले, विवेकी व मानवतावादी जीवन तत्वावर आधारित मानसोपचारामुळे कोणतीही व्यक्ती आनंदी व सर्जनशील जीवन जगु शकते.
असे त्यांनी सांगितले होते.’माझे जीवन हाच माझा संदेश आहे’ असे ते म्हणत. त्यांच्या चरित्रातून ते प्रत्ययाला येते. डॉ. एलिस यांचा मानसोपचारतज्ञ म्हणून वेध घेताना त्यांचे भावविश्वही टिपले आहे. त्यांच्या व्यक्तीमत्वातील माणूसपण शोधले आहे. त्यांचे त्यांचे क्रांतिकारी विचार पोहोचविले आहेत.
Reviews
There are no reviews yet.