Pratipashchandra (प्रतिपश्चंद्र)Author/s: Prakash koyade
In stock
छत्रपती शिवाजी महाराज आणि बहिर्जी नाईक यांनी अत्यंत गुप्त पद्धतीने लपविलेले एक गुढ! एक शिवकालीन रहस्य ज्याची सुरक्षा आजही महाराजांचे आठ शिलेदार जीवाची बाजी लावून करत आहेत
स्वराज्याचा मानबिंदू…बत्तीस मण सुवर्ण सिंहासन ज्यासाठी महाराष्ट्राची अख्खी एक पिढी लढून मेली, ज्याबद्दल किती भ्रम आजवर पसरवण्यात आले आणि सध्या ते सिंहासन कुठे असावं?
चौदावे शकत, सतरावे शतक आणि एकविसावे शतक या तीन कालखंडाना जोडणारी ऐतिहासिक थरार कादंबरी ‘प्रतिपश्चंद्र’! भरभराटीच्या उंचीवर असतानाच लयास गेलेले ‘विजयनगर साम्राज्य’ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना जोडणारा ‘तो’ गुप्त दुवा कोणता?
राज्याभिषेकानंतर झालेल्या दक्षिण दिग्विजयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना हाती कोणती गोष्ट लागली होती? तामीळनाडूमधील चिदंबरम मंदिरातील नटराजाची मुर्ती सातशे वर्षांपासून कोणते रहस्य उजागर होण्याची वाट पाहत आहे?
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या ‘ग्रॅंडफादर्स क्लॉक’ किंवा ‘8 डे क्लॉक’ या घड्याळीचा याच्याशी काय संबंध?
छत्रपती शिवाजी महाराज आणि ‘आठ’ या अंकाचा संबंध!
राजभवनात एका ब्रिटीश अधिकाऱ्याने सव्वाशे वर्षांपूर्वी कोणती मौल्यवान वस्तू भिंतीत लपवून ठेवली आहे?
राजभवनच्या खाली जमिनीत नेमकं कोणतं रहस्य काळाने दडवून ठेवलं आहे?
मंत्रालयाला २०१२ मध्ये लागलेल्या आगीत नेमकी कोणती महत्त्वाची कागदपत्रे जळाली?
छत्रपती शिवाजी महाराजांकडील जगदंबा तलवारीवर तीन वेळेस कोरलेले ‘IHS’ हे इंग्रजी शब्द कोणते रहस्य बाळगून आहेत?
अशा शेकडो गूढ प्रश्र्नांची उत्तरे म्हणजे प्रतिपश्चंद्र!
गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईकांचे आजवर कधीही बाहेर न आलेले रूप, कल्पनाशक्ती आणि अचूक नियोजाचा संगम म्हणजे प्रतिपश्चंद्र!
एक अद्भुत, अनाकलनीय एक ऐतिहासिक प्रवास… कलेकलेने वाढत जाणाऱ्या प्रतिपदेच्या चंद्राचा प्रवास!
विजयनगर साम्राज्याकडून स्वराज्याच्या खांद्यावर आलेली एक जबाबदारी…
भारताच्या भुमीत लपलेल्या, जगातील सर्वात मोठ्या खजिन्याची कहाणी!
महाराष्ट्रातील आजवरचे सर्वात मोठे रहस्य… प्रतिपश्चंद्र!
Reviews
There are no reviews yet.